उन्हाळ्यात सौंदर्याची निगा कशी राखलं
१) चेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी खालील उपाय :-
आपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा, नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते. मात्र आता काळजी करण्याचे काही कारण नाही! पुढे आम्ही काही टिप्स देत आहोत, त्या तुमचा चेहरा नेमही तजेलदार दिसावा याकरिता निश्चितच उपयोगी पडतील!
चेहरा नेहमी तजेलदार दिसावा यासाठी भरपूर प्रमाणात फलाहार घ्यावा.जेवणातही फळभाज्यांचे प्रमाण जास्त असावे.रासायनिक द्रव्ये असलेली पेये, म्हणजेच कोल्डड्रींक्स, फास्ट फूडचे सेवन टाळावे.धुम्रपान, मद्यसेवन टाळावे.उन्हात घराबाहेर पडतानाचेहरा स्कार्फने झाकावा, परसट हॅट, फुल बाह्यांचा शर्ट, सनकोट इ.चा वापर करावा.योग्य सनस्क्रीनचा वापर करावा. वारंवार कपाळावर आठय़ाकाढणे, राग व्यक्त करणेयामुळे सुद्धा कपाळावर
घड्या पडून व्यक्ती वृद्ध दिसू लागतो. म्हणून ह्या सवयी टाळाव्यात.
२) क्लिन्झिंग:-
दिवसभरातून कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहरा क्लिन्झिंग लोशनने स्वच्छ करावा. पहिली गोष्ट म्हणजे यामुळे मेकअपचा थर निघून जातो आणि क्लिन्झिंग केल्यामुळे चेहऱ्याची त्वचेवरील धूळ व कार्बनचा थर निघून जातो. बाजारात उपलब्ध असलेले क्लिन्झिंग मिल्क किंवा न तापविलेल्या दुधात २/३ थेंब लिंबूरस मिसळून घरीच क्लिन्झिंग मिल्क करावे किंवा टोमाटो रसात एक चिमुट फ्रुट सॉल्ट टाकून चेहऱ्याला स्वच्छ करावे.
डोळ्याची निगा घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण जो पर्यत आपल्याला डोळ्यांनी चांगले दिसते तो पर्यंत हे विश्व, निसर्ग आणि सर्व गोष्टी आपण पाहू शकतो पण जर का या डोळ्यांचा प्रकाश गेला तर मात्र आपल्याला सर्व ठिकाणी काळा अंधारच दिसेल. किती भयानक आहे. साधी कल्पना देखील मनाचा थरकाप उडविते.बोलले जाते की डोळे मनाचा आरसा असतात. सुंदर डोळे कोणाच्याही सौंदर्यात आणखी भर घालते. तर पाहूयात आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यात वाढ कशी करता येईल.
- · भरपूर पाणी पिण्याची सवय लावा .
- · डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावे यासाठी ‘अ‘ जीवनसत्व असलेल्या हिरव्यापालेभाज्या, दूध, अंडी , मांस, मासे यांचा आहारात समावेश करावा.
- · काकडीच्या थंडगार चकत्या किंवा बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे.
- · गाजराचा कीस , बीटाचा कीस , कच्चे दुध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या आवती-भोवती हलका मसाज करावा. याने डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील.
- · उन्हात जाताना, वाहन चालविताना अथवा कंपनीतील कामगारांनी चष्मा अवश्य वापर करावा.
- · काजळ, सुरमामध्ये समाविष्ट केलेल्या रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांना इजा होवू शकते. त्यामुळे त्याचा वापर शक्यतो टाळावा.
४) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी खालील उपाय :-
सुंदर दिसण्यासाठी फक्त चेहराच सुंदर असून चालत नाही तर सर्वांगीण सौंदर्य मिळवण्यासाठी नितळ , तेजस्वी चेहऱ्यासोबत सुडौल , नितळ मान , गळा हे सौंदर्य वाढविण्याचे पूरक काम करतात .
- · आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ घ्यायला हवी.
- · चंदन पावडर व मुलतानी माती दह्यात भिजवून मानेला चोळून दहा मिनिटे धुवावे.
- · बदाम तेल , कोल्डक्रीम व गुलाबपाणी समप्रमाणात एकत्र करून एक मसाज क्रीम बनवावी .ती मसाज क्रीम बोटांना लावून हळूवारपणे मसाज करावा.

Comments
Post a Comment